वसई: नालासोपारा पूर्वेच्या पंचम पॅलेस येथील इमारतीत एका घरात आग लागली होती. रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. ही आग नियंत्रणाचे काम सुरू असतानाच सिलेंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.नालासोपारा पूर्व येथील पंचम पॅलेस , बी .विंग रूम नंबर .२०७ या ठिकाणी आग लागली होती. या आगीची माहिती स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली होती.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रण करण्याचे सुरू होते. याच दरम्यान खोलीत जळत असलेल्या आगीमध्ये असलेला सिलेंडरचा झाला. यात दोन अग्निशमन दलाचे जवान आगीच्या बॅक ड्रॉप मुळे होरपळले आहेत. ,राहुल पाटील व कुणाल तामोरे अशी जखमी जवानांची नावे आहेत. त्यांना आचोळे रोड ,ओझोन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले असल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात आले आहे.