लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पाण्याच्या टँकरचे नियंत्रण सुटून तो थेट एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसला. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोड येथे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही

संतोष भुवन वरून पाण्याचा एक टँकर नालासोपाराच्या दिशेने येत होता. मात्र अचानक या टँकरचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्यावरील पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात हा टँकर थेट तुळींज रोडवरील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयातच शिरला. या टँकरचा वेग एवढा प्रचंड होता की थेट दरवाजा तोडून तो कार्यालयात शिरला. यावेळी कार्यालयात एक महिला सफाई कर्मचारी होती. मात्र ती या घटनेतून बचावली टँकर चालकालाही किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे तुळींज रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे

Story img Loader