वसई: नवीन मोटर वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपावर असल्याने इंधनाच्या  गाड्या शहर येणार नाहीत याच भीतीने वसई विरार मधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे. या नवीन कायद्यानुसार दहा वर्षाची शिक्षा व लाखो रुपये दंडांची तरतूद आहे. तसेच हा कायदा आता अजामिनपात्र आहे. या कठोर  कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही हिसंक आंदोलन झाले.अजूनही यावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालक आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा परिणाम हा मालवाहतूक यासह इतर वाहतुकीवर होऊ लागला आहे.या संपामुळे इंधनाच्या गाड्या शहरात येतील की नाही या भीतीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी वसई विरार मधील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती.वसईच्या स्टेला येथील पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते.त्यामुळे वाहतूक नियोजन करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the fear of non entry of vasai fuel vehicles into the city motorists queued up at the petrol pump amy
Show comments