लोकसत्ता प्रतिनिधी 

वसई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यात येत आहे. अजूनही तालुक्यातील २ लाख ९ हजार ८७८ शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित असून त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

villagers have started an indefinite hunger strike at Pentakali reservoir.
महिला झाल्या रणरागिणी! उतरल्या पेनटाकळी धरणात!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pune Municipal Corporation is losing revenue due to income tax defaulters worth crores of rupees Pune print news
बड्यांची थकबाकी, सामान्यांना भुर्दंड, नक्की काय आहे प्रकार! कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधानिर्मितीला फटका
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
100 bed hospital in Uran is stalled again causing another delay after fifteen years
उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, मंजुरी आणि भूमिपूजनानंतरही इमारतीचे काम रखडलेलेच
Income tax slabs for 2025-26 explained with focus on individuals earning slightly above Rs 12 lakh and marginal relief.
१२ लाखांपेक्षा थोडेसे जास्त उत्पन्न असणाऱ्यांना कर सवलत मिळणार का? जाणून घ्या कसा मोजायचा Marginal Relief चा लाभ
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात

अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जाते. या धान्याचे वितरण पारदर्शक रित्या होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने त्याचे वितरण १८० शिधावाटप केंद्रावर सुरू आहे.  वसईत  सुमारे १ लाख ४५ हजार ९०६ इतके प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ३ हजार ८०६ अंत्योदय शिधापत्रिका धारक असून त्यांचे एकूण ५ लाख ९८ हजार ७० इतके शिधा लाभार्थी आहेत.

पीओएस यंत्रात आधार प्रमाणीकरण न करण्यात आल्याने अनेक शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. आता सर्वच शिधालाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे काम ही शिधा वाटप केंद्रावर सुरू होते. मात्र काही शिधा लाभार्थी  ई केवायसी करण्यास पुढे येत नसल्याने ते ई केवायसी पासून प्रलंबित राहू लागले आहे. आतापर्यंत वसईत ५ लाख ९८ हजार ७० शिधालाभार्थ्यांपैकी ३ लाख ८८ हजार १९२ लाभार्थ्यांचे ई केवायसी झाले आहे. तर अजूनही २ लाख ९ हजार ८७८ इतके शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.

आता शासनाने ई केवायसी करण्यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली असून प्रलंबित असलेल्या शिधा लाभार्थ्यांना ई केवायसी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे असे आवाहन पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी केले आहे.

अन्यथा धान्य मिळणार नाही

ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र लाभार्थी त्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करतात. याशिवाय काही वेळा धान्य मिळत नसल्याच्या, योग्य रित्या पीओएस मध्ये माहिती दाखवत नसल्याच्या तक्रारी करीत असतात. परंतु त्यासाठी आधार प्रमाणीकरण करून घेतले तर त्या लाभार्थ्यांची ऑनलाइन स्वरूपात नोंद होते. ई-केवायसी केले नाही, तर १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही असा इशारा ही पुरवठा विभागाने दिला आहे.

शिधा लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्याचे काम सुरू आहे. जे लाभार्थ्यांनी अजूनही ई केवायसी केले नसेल त्यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत तात्काळ करून घ्यावे. शिधावाटप केंद्रावर सुविधा उपलब्ध केली आहे. -भागवत सोनार, पुरवठा अधिकारी वसई तालुका

Story img Loader