वसई– मुलीचा संसार विस्कटल्याने हताश झालेल्या ७१ वर्षीय वृध्द आईने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. मीना दमानी असे या वृध्द महिलेचे नाव आहे. मीरा रोडच्या शांती नगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री नयानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा संसाराची झालेली वाताहत, त्यामुळे मुलीची होणारी तगमग सहन न झाल्याने दमानी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> विरार: आई ओरडल्याने मुलाची तलावात उडी मारून आत्महत्या

मीरा रोडच्या शांती नगर येथील सेक्टर २ मध्ये असलेल्या प्रेमकिरण सोसायटी मध्ये ७१ वर्षीय मीना दमानी या मुलीसोबत रहात होता. त्यांची मुलगी वर्षा पारेख (४४) हिचा पतीसोबत मागील ७ वर्षांपासून न्यायालयात कौटुंबित वाद सुरू होता. त्यामुळे पती पत्नी वेगळे रहात होते. वर्षाची मुलगी पतीकडे रहात होती. सतत न्यायालयात ओढताण, दूर गेलेली मुलगी संसार विस्कटण्याची भीती यामुळे वर्षा हताश झाली होती. मुलीची ही अवस्था पाहून मीना दमानी यांची देखील घालमेल व्हायची. आपल्या मुलींचं पुढे कसं होणार याची चिंता त्यांना भेडसवायची. यामुळे त्यांना नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात मीना दमानी यांनी प्रेमकिरण या राहत्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन वरून उडी मारून आत्महत्या केली.

हेही वाचा >>> विरार: मोबाईल हॅक करून तरुणीची अश्लील छायाचित्रे वायरल

प्रेमकिरण ही ४ मजली इमारत आहे. बुधवारी दुपारी दमानी या गच्चीवर गेल्या. खुर्ची ठेवून त्या कठड्यावर चढल्या आणि तेथून उडी मारून स्वत:ला संपवले. मुलीचा विस्कटलेला संसार पाहून व्यथित होऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Story img Loader