लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई विरार शहरातील वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा व त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वीज ग्राहक सुविधा केंद्र तयार केली आहेत. मात्र निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे ही केंद्र २५ दिवसांपासून बंद आहेत.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. वीज ग्राहकांच्या तक्रारी व विविध कामाच्या मदतीसाठी महावितरणच्या अंर्तगत वसई मंडळ कार्यालयाच्या जवळील इमारतीत वीज ग्राहक सेवा सुरू केंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्रामार्फत वीज ग्राहकांना एकाच ठिकाणी  सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील या उद्देशाने सुरू केले होते. या ग्राहक सुविधा केंद्रामार्फत नवीन वीज पुरवठा देणे, वीज देयकावरील नाव बदलणे व अन्य दुरुस्ती, वाढीव वीज भार, वीज देयक तक्रार निवारण, वीज देयक काढून देणे अशा विविध सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र यापूर्वी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा ठेका हा ३० नोव्हेंबर पासून संपुष्टात आल्याने १ डिसेंबर पासून हे ग्राहक सुविधा केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. मागील २५ दिवसांपासून निविदा प्रक्रियेच्या विलंबामुळे वीज ग्राहक केंद्र बंद आहे.

आणखी वाचा-मिरा भाईंदराला आता विविध रंगांची ओळख, पालिकेने लागू केला ‘कलर कोड’

ग्राहक केंद्र चालविण्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त केला जाणार होता. यासाठी महावितरणने निविदा ही काढली होती. यात पाच ठेकेदारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील तीन ठेकेदार अपात्र ठरले तर दोन जण पात्र ठरले आहेत.अजूनही या निविदेचा तिढा सुटला नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. मात्र या केंद्रातून ज्या सेवा ग्राहकांना दिल्या जात होत्या त्या सद्यस्थितीत विभागीय कार्यालयातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत असेही महावितरणने सांगितले आहे.या केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा-वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल

कर्मचारी अडचणीत

वसई व विरार ग्राहक सुविधा केंद्र २५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या सुविधेसोबतच या ठिकाणी काम करणारे कर्मचारी ही घरी बसून आहेत.त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्रात २०ते २५ कर्मचारी काम करीत होते. लवकर याबाबत निर्णय घेऊन पुन्हा एकदा आम्हाला सेवेत रुजू करून घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

Story img Loader