वसई : ३१ डिसेंबर व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मार्गाने मद्याची विक्री व वाहतूक होत असते. असे प्रकार रोखण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यात चार भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासून लोकांना नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागतात. त्यानिमित्ताने हॉटेल्स , रिसॉर्ट, फार्म हाऊस, अशा विविध ठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या जात असतात. यामध्ये मद्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याने मद्याचा वापरही होत असतो. यासाठी मद्याचे परवाने न घेताच विविध ठिकाणी बेकायदेशीर मद्याची वाहतूक व विक्री केली जाते. तसेच काहीवेळा सिल्वासा , दमण या भागात मद्य स्वस्तात मिळत असल्याने छुप्या मार्गाने हा मद्यसाठा शहरात आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला रोखण्यासाठी टोलनाका, इतर विविध ठिकाणच्या भागात वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी केली जाणार आहे. यासाठी कार्यकारी अधिकारी व जवानांना सोबत घेऊन चार पथके स्थापन केली आहेत. ही पथके आठ तालुक्यात विविध भागात नाकेबंदी करुन अचानकपणे गस्त घालतील व गुप्त पध्दतीने कोणालाही संशय येऊ नये म्हणून साध्या वेशात सुध्दा माहिती काढून अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पालघर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा… लोक चळवळीनेच स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते – मुख्यमंत्री

सीमावर्ती भागातून होणाऱ्या मद्यावर लक्ष

अवैधपणे गुजरात राज्यात बेकायदेशीरपणे मद्य जाणार नाही व दमण, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशमधून अवैधपणे मद्याची तस्करी होवुन महाराष्ट्र राज्यात येणार नाही यावर ही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर जनजागृती

विना परवाना तसेच बेकायदेशिर मद्यविक्रीस प्रतिबंध करण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत वसई तालुक्यातीलनवापुर, राजोडी, अर्नाळा, कळंब याठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावरील भागात ही जनजागृती करण्यात आली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excise department appoints four teams in palghar district to check illegal liquor transport and sale asj
Show comments