भाईंदर :– मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या नावाचे बनावट व्हाट्सअप्प क्रमांकावरून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून अशा कोणत्याही संदेशाला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात सायबर गुन्हाच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे.यात एखाद्या व्यक्तीच्या नावे बनावट मोबाईल क्रमांक तयार करून पैसे उकळण्याचे काम हे सायबर भामटे करत असतात. आता या भामट्यानी चक्क मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या नावे  बनावट व्हाट्सअप क्रमांक  (+91-7069458206)तयार  केला आहे.आणि पालिकेच्याच अधिकाऱ्यांना व शहराती प्रतिष्ठित नागरिकांकडे पैश्याची मागणी करण्यात येत आहे.त्यामुळे अशा संदेशाला बळी न पडता  थेट पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले आहे.