१५ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे.घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्री उत्सवाचा जागर सर्वत्र सुरू असल्याने मांगल्याचे वातावरण पहायला मिळते. या नवरात्री निमित्ताने विविध ठिकाणी आदिशक्तीच्या मंदिरात ही उत्सवाला सुरुवात होत असते. या नवरात्रोत्सवानिमित्ताने नायगाव पूर्व जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या प्राचीन कालीन चंडिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला असून त्यानिमित्ताने या देवस्थानाचा घेतलेला आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई तालुक्यातील नायगाव पूर्व विभागात जूचंद्र येथील डोंगर माथ्यावर निसर्गरम्य परिसरात आई चंडिका मातेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची रचना त्यामध्ये एका वर एक रचलेले दगड, शिळा, आणि दगडाच्या असलेल्या चौथऱ्यावर श्री चंडिका, श्री कालिका, श्री महिषासुरमर्दिनी, श्री गणेश व दगडात कोरेलेल्या वाघाच्या प्रतिमा आहेत.

आणखी वाचा-नालासोपार्‍यात हुंडाबळी, हाताच्या तळव्यावर लिहून नवविवाहितेची आत्महत्या

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेचे हे मंदिर प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. पांडव अज्ञात वासात गेले तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी देव देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्याच अज्ञातवासात प्रतिष्ठापना केलेले हे एक मंदिर असल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर अनेक वर्षे जुने आहे. या मंदिरात हळूहळू येथील ग्रामस्थांनी व चंडिका देवी न्यासाच्या वतीने नूतनीकरण केले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने मार्गिका आहेत.

मागील तीन वर्षांपूर्वी या मंदिराला जिल्हा प्रशासनाकडून तीर्थ क्षेत्राचा ही दर्जा मिळाला. सुरवातीला केवळ आजूबाजूच्या गावातील नागरिक येथे दर्शनाला येत होते. मात्र मातेची प्रसिद्धी सर्वत्र पसरली असल्याने मुंबई ठाणे, पालघर यासह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणच्या भागातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्री उत्सवात सतत या मंदिरात भाविक भक्तांची अधिक प्रमाणात रेलचेल सुरू असते.

आणखी वाचा-इस्त्रायलच्या घराघरातील नागरिक युध्दासाठी रवाना, देश शोकसागरात मात्र शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार

यंदा देवीचा ६९ वा नवरात्री उत्सव आहे.या नऊ दिवसात मंदिरात धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ, गरबा नृत्य पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रम श्री चंडिका देवी न्यासातर्फे घेण्यात येतात. तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चहापान, अन्नछत्र मध्ये भोजन अशी व्यवस्था केली जाते. डिजिटल दर्शन व्यवस्थेसाठी मंदिरात दूरदर्शन संच बसविण्यात आले आहेत. स्वच्छगृह, पार्किंग व्यवस्था, उद्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे चंडिका देवी न्यासाचे विश्वस्त मनोहर पाटील यांनी सांगितले आहे.

वर्षभरात मंदिरात इतर ही कार्यक्रम

प्रसिध्द असलेल्या चंडिका मंदिरात वर्षभरात नवरात्री उत्सवाच्या सोबतच विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे होत असतात. यात आईचा चैत्र यात्रोत्सव, गोर गरिबांसाठी अवघ्या १०१ रुपयात सामुदायिक विवाह सोहळा यासह इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous chandika mata on juchandra girishikhara mrj