लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई- शेतात नागंरणी करत असताना ट्रॅक्टर मध्ये पाय अडकून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. सदानंद मारले असे या शेतकर्‍याचे नाव असून त्याच्यावर मागील आठवड्यापासून मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते

२० नोव्हेंबर रोजी पालघऱ जिल्ह्यातील मनोर येथे सदानंद मरले (३२) हा शेतकरी आपल्या शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टरने पेरणी करत होता. बांधावरील गवत ट्रॅक्टर मध्ये अडकले तेव्हा मरले याचा पाय गवतावर असलेला डावा पाय ट्रॅक्टर मध्ये अडकला. ट्रॅक्टचा मागील भाग तोडून त्याचा पाय काढण्यात आला. मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्याला उपचारासाठी सुरवातील मनोर येथील खासगी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी काशिमीरा येथील खासगी रुग्णालया हलविण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सदानंद मारले याच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा रक्तदाब कमी झाला होता. पायाला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

आणखी वाचा-मीठ उत्पादनावर पावसाचा खोडा, अवकाळीमुळे मीठ उत्पादन लांबणीवर

ही घटना पालघर जिल्ह्यातील मनोर येथे घडली आहे. मयत इसमावर आमच्या हद्दीत उपचार सुरू होते. आमच्याकडे रात्री रुग्णालयातू अहवाल आल्यानंतर आम्ही अपमृत्यूची नोदं केली आहे, अशी माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साठे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers leg caught in tractor while ploughing dies after 8 days while undergoing treatment mrj
Show comments