वसई- वसईतील मुळगाव येथे राहणार्या पिता पुत्राने एकाच वेळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डिसोजा पिता-पुत्रांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार तीन जणांना वसई पोलिसांनी अटक केली आहेवसई पश्चिमेच्या मुळगाव येथील मोठेगावात डिसोजा कुटुंबिय राहतात. त्यांच्या जमिनीचे एक प्रकरण तलाठी कार्यालयात प्रलंबित होते.
हेही वाचा >>>विसर्जनादरम्यान विरार पारोळ येथील गणेश भक्ताचा बुडून मृत्यू
जमिनीच्या वादातून एडविन डिसोजा (५५) आणि त्यांचा मुलगा कुणाला (२८) यांना काही कार्यकर्ते त्रास देत होते त्यामुळे डिसोझा पिता-पुत्र तणावात होते या तणावातून शुक्रवारी सकाळी दोघा पितात मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी डिसोजा पिता-पुत्रांनी लिहिलेली चिठ्ठी लिहिली असून ४ जणांची नावे लिहिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल डिकुन्हा, राविकुमार वर्मा आणि नईम अशा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.