विरार :  मुसळधार पावसाने अनके इमारतीत पाणी साचून राहिल्याने वाहनांमध्ये पाणी जावून वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. करोना काळात आधीच आर्थिक मंदीचा फाटका सहन करणाऱ्या वाहन धारकांना रस्त्यांवरील पावसामुळे वाहन दुरुस्तीचा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. आपली वाहने दुरुस्त करण्यासाठी आता पदरमोड करून नागरिक गॅरेज वर रांगा लावत आहेत.

शहरामध्ये रविवारी दाखल झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरत रात्रभर भूफान फलंदाजी केली. यामुळे रविवारी सकाळपर्यंत शहरातील अनेक भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. बहुतांश सकल भागात कमरे एवढे पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून सामानांचे नुकसान तर केलेच पण त्याच बरोबर घराबाहेर उभी असलेली वाहने रात्रभर पाण्यात असल्याने वाहनात पाणी जाऊन त्यांच्यात बिघाड निर्माण झाले. यात बहुतांश चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झालेचे समोर आले आहे.

आधीच करोना काळात आर्थिक तंगीचा नागरिक सामना करत आहेत. त्यात कामावर जाण्यासाठी शासकीय प्रवास यंत्रणा नसल्याने मागील वर्षभरात अनेकांनी आपली खासगी वाहने खरेदी केली. पण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने. वाहनांचे मोठे नुकसान केले. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर खडय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्त्यांवर आणि खडय़ात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहने खडय़ात आपटून त्यांचे नुकसान होत आहे. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी वहानांना अपघाताला सामोरे जावेल लागतआहे. वाहने खराब होत असल्याने अनेकांच्या कामावर दांडय़ा लागत आहेत.

विरार पूर्व येथील जलबाव वाडी परिसरातील अत्तार अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या स्न्ेहल कांबळे यांनी सांगितले की, त्यांच्या दोनही चारचाकी वाहनात इंजनमध्ये पाणी गेल्याने त्यांना जवळ जवळ ४० हजाराहून अधिक खर्च आला आहे. तर रिक्षाचालक मनोज पांडय़े यांनी त्यांची रिक्षा पूर्ण पाण्याखाली गेली असल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. त्यांना १२ हजार रुपये खर्च आला आहे. तर स्न्ेहा मोटर्स चे मालक सुशांत राणे यांनी माहिती दिली की, सोमवार पासून मोठय़ा प्रमाणात वाहनात पाणी शिरून वाहने खराब होत असल्याने आमच्या गॅरेज वर रांगा लावत आहेत. अनेकांकडे सध्या पैसे नसल्याचे आम्ही काहीना उधारीत सुध्दा कामे करत आहोत.

करोना वातावणामुळे रेल्वे सेवा बंद आहेत, यामुळे आम्हाला आमची खाजगी वाहने घेवून कामावर जावे लागते. पण पावसामुळे वाहने करब झाल्याने आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.

-रमेश नाईक, स्थानिक राहिवाशी

Story img Loader