वसई : वसई पूर्वेच्या चिंचोटी येथे थर्माकोलच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई पूर्वेच्या भागात चिंचोटी भिवंडी रोड वरील ज्ञानोदय शाळेच्या बाजूला थर्माकोलचा कारखाना आहे. या कारखान्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास काम सुरू असताना भीषण आग लागली. या लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा… सिमेंट कारखान्यांमुळे प्रदूषण; मुंबई-अहमदाबाद महामार्ग परिसरातील १७ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा
हेही वाचा… वर्सोवा पूल धोकादायक?
स्थानिकांनी या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत आहेत. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्यातील मुद्देमाल जळून खाक झाला आहे. ही आगीची घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.