लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई : वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समिती कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून या आगीत पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या भागात वसई विरार महापालिकेचे पेल्हार प्रभाग समितीचे कार्यालय आहे. गुरुवारी पहाटे अचानक पणे य प्रभाग समिती कार्यालयाती इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या लागलेल्या आगीमुळे पाणी पुरवठा, बांधकाम, आरोग्य विभागाची विविध प्रकारचे दस्तऐवज व संचिका यात जळून खाक झाल्या आहेत. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-विरार मध्ये अल्पवयीन मुलीचा रस्त्यात विनयभंग, सिरियल मॉलेस्टरची शक्यता

या आगीत ज्या जी कागदपत्रे व संचिका जळाल्या आहेत त्याचा पंचनामा व चौकशी केली जाईल असे महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांनी सांगितले आहे. संगणकीय प्रणालीमध्ये जी माहिती आहे ती पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र दस्तऐवज नष्ट करण्यासाठी लावली असावी असा संशय ही नागरिकांमधून व्यक्त होत असून याची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.