भाईंदर :- शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  शिवसेनेच्या ( शिंदे गट ) लोकप्रतिनिधीचा बॅनर लावून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा शहरातील पहिलाच गुन्हा आहे. काशिमीरा येथील आनंद दिघे चौकात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षातर्फे २९ मार्च रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे जाहिरात फलक लावण्यात आले होते. ही बाब निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाचे अधिकारी शशिकांत पवार यांच्या निदर्शनास आली होती. याबाबत त्यांनी आयोजकांना विचारणा केली असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.त्यामुळे आचारसंहिता नियमांचे  उल्लंघन केल्याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

Story img Loader