भाईंदर : माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कोकण विभागीय पदवीधर निवडणुकीत मतदान केल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. आम्ही मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले असे मेहता यांनी पोस्ट मध्ये म्हटले होते. परंतु २०१९ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ ८ वी उत्तीर्ण असलेले नरेंद्र मेहता अचानक पदवीधर कसे झाले? असा सवाल उपस्थित झाला. प्रकरण अंगलट येताच मेहता यांनी नंतर आपल्या पोस्ट मध्ये बदल केला असून ‘मतदान केले’ ऐवजी ‘मतदान करा’ असे लिहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी मतदान झाले. भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सपत्नीक एक छायाचित्र समाजमाध्यमावर पोस्ट केले. या निवडणुकीमध्ये आम्ही मतदानाचा हक्क बजावला. तुम्ही देखील योग्य उमेदवार निवडा असे आवाहन करण्यात आले होते. छायाचित्राता मेहता दांपत्याने बोटाला शाई लावल्याचे दाखवले होते. मात्र मेहता हे केवळ आठवी पास असल्याचे त्यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यामुळे अचानक पदवीधर निवडणुकांमुळे त्यांनी मतदान केले कसे असा सवाल विरोधकांनी केला आहे.

हेही वाचा…वसई: जमावाच्या मारहाणीत मोबाईल चोराचा मृत्यू

प्रकरण अंगलट येताच मेहता यांनी आपल्या पोस्ट मध्ये बदल केला आहे. आम्ही मतदानाचा हक्का बजवाला या मूळ मजकुरात बदल केला असून मतदानाचा हक्क बजावा असे लिहिले आहे. जनजागृतीसाठी ते छायाचित्र टाकल्याचे मेहता यांच्या समर्थकांनी सांगितले. मतदार यादीत नाव नसताना मेहता केंद्र परिसरात कसे फिरत होते असा सवालही विरोधकांनी केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla narendra mehta share a photo on facebook of voting in graduate constituency election despite eighth grade education psg