वसई : महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याप्रकरम्णी मीरा रोड येथील के.एल.तिवारी आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या रुपाली गुप्ते, तसेच मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाचे साहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे यांच्यासह चौघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार यांची मुलगी आर्किटेक्टचे शिक्षण घेत असून ती शिकत असलेली शैक्षणिक संस्था बंद झाली होती. त्यामुळे तिला के. एल. तिवारी आर्किटेक्चर महाविद्यालयात प्रवेश हवा होता. यासाठी मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांची परवानगी आवश्यक होती. महाविद्यालयात प्रवेश आणि परवानगी मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते (५०) यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम कार्यालयीन अधीक्षक संतोष हुबाले  (४५) यांना देण्यासाठी सांगितली. हुबाले यांच्या सांगण्यावरून  मागणीतील १५ हजार रुपयांची  रक्कम कार्यालातील वरिष्ठ लिपिक श्रेया बने यांनी स्वीकारली. ती रक्कम स्वीकारताना बने यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. चौकशीत मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागाचे साहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे (५४) यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन् झाली. त्यामुळे पोलिसांनी प्राचार्या गुप्ते, सहाय्यक संचालक निखाडे तसेच अधीक्षक हुबाले यांनाही अटक केली.

१४ विद्यार्थ्यांच्या तक्रारी

आरोपींनी अशाप्रकारे १४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्याप्रमाणे दहा विद्यार्थ्यांकडून जमा केलेली सव्वा तीन लाख रुपयांची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जमा केली आहे. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four arrested including principal in bribery case for admission zws