वसई : वसई विरार आणि मिरा रोड मध्ये वेगवेगळ्या घटनेत ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिला आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे.

पहिली घटना वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. भुईगाव येथे रहाणाऱ्या नाताल डाबरे (८०) आणि त्यांची मुलगी मीना डाबरे (५६) गावातील भोळा तलावाजवळ गेल्या होत्या. बराच वेळ होऊन गेला तरी त्या परत आल्या नव्हत्या. त्यामुळे नाताल डाबरे यांचा मुलगा केतान याने शोध घेतला असता तलावाजवळ दोघींच्या चपला आढळल्या. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोध घेऊन दोघींचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास वसई पोलीस ठाण्याचे वाय के भोये हे करत आहेत.

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू

हेही वाचा… ईद सणानिमित्त रस्त्यावरील नमाज पठण बंद, मिरा रोड मधील मुस्लिम समाजाचा निर्णय

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार जवळील जाबरपाडा येथे रहाणारा रुद्र पिलाना ( दीड वर्ष) हा चिमुकला घरातील पणायच्या टब मध्ये बुडून मरण पावला. खेळत खेळता तो पाण्याच्या टॅब मध्ये गेला होता. बऱ्याच वेळाने त्याच्या कुटुंबीयांना याबाबत समजले. बेशुद्धावस्थेत असलेल्या रुद्रला सुरुवातीला पेल्हार येथील गॅलेक्सी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक तपासासाठी त्याला पालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आम्ही अधिक तपास करत असून सध्या आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

हेही वाचा… विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन

तिसरी घटना काशिमिरा जवळील घोडबंदर येथील तलावात घडली आहे. या परिसरात राहणारा इरफान पाशा (३१) याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader