लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्वसामान्य ग्राहकांची तसेच बँकांची फसवणूक करणार्‍या ठकसेनाला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. मागील ३ वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक
torres investment scam loksatta news
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात तिघांना अटक, २६ लाखांची रोकड जप्त
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
ED arrested two suspecte for 1200 crores in case of financial misappropriation
मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : दुबईला पळण्याच्या तयारीत दोघांना गुजरात विमानतळावरून अटक
mumbai, retired woman income tax department Digital arrested
प्राप्तीकर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्ट, २५ लाख रुपयांची सायबर फसवणूक
Robin Uthappa arrest warrant
Robin Uthappa fraud case: रॉबिन उथप्पाची अटक टळली; फसवणूक प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय!

२०२० मध्ये सुशील दुबे (४५) या ठकेसनाने मीरा रोड येथील एचडीएफसी बँकेची बनावट धनादेशाद्वारे १२ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणातील आरोपी दुबे याच्याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र तो पोलिसांना ३ वर्षापासून गुंगारा देत होता. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून त्याला अटक केली आहे. त्याने या कालावधीत बनवाट कागदपत्रांच्या आधारे विविध प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली होती. त्याच्याविरोधातील वालीव, नालासोपार, अर्नाळ आणि मीरा रोड येथील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. दुबे याच्याविरोधात २००४ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच नागपूर येथे फसवणूकीचे गुन्हे दाखल होते. त्यात त्याला अटकही करण्यात आली होती.

आणखी वाचा-वसई: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर सट्टेबाजी करणार्‍याला अटक

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस उपनिरीक्षक नितिन विचारे आदींच्या पथकाने कारवाई करून दुबे याला अटक केली

Story img Loader