वसईतील बांधकाम ठेकेदारार  प्रमोदकुमार बिंद यांच्या हत्येचा अखेर उलगडा करण्यात गुन्हे शाखा ३ च्या पथकाला यश आले आहे. बिंद याच्या नातेवकाईनेच जुगाराच्या पैशांसाठी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. कसलाही दुवा नसताना गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी तरुणाला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.

बांधकाम ठेकेदार असलेले प्रमोदकुमार बिंद (५२) हे नालासोपारा पूर्वेच्या घरतवाडी येथील जोंगेद्र यादव चाळीत रहात होते. त्यांचे कुटुंबिय गावी गेल्याने ते घरात एकटे रहात होते. २४ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या घरात बिंद यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र बिंद यांची हत्या कुणी आणि का केली त्याचा कसलाच दुवा सापडत नव्हता. मयत बिंद याचे कुणाशी वैमनस्य नव्हते. त्यांच्या मोबाईलच्या तपशिलातही काही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

हेही वाचा >>> शहरबात… सुरूची वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर

या प्रकरणी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक तपास करत होते. पोलिसांनी वेगवेगळ्या पध्दतीने तपास करून उत्तर प्रदेशाच्या वाराणसी जिल्ह्यातील कछवा चौरहा येथून समीरकुमार उर्फ समशेर बच्चालाल बिंद (२३) याला अटक केली.

हेही वाचा >>> वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम

जुगारासाठी पैसे नसल्याने केली हत्या समशेर बिंद हा मयत प्रमोद कुमार बिंद याचा दुरचा नातेवाईक होता. त्याला जुगाराचे व्यसन होते. त्यासाठी त्याने मोटारसायकलही गहाण ठेवली होती. ती सोडविण्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्यामुळे तो नालासोपारा येथे राहणारे त्याचे नातेवाईक प्रमोदकुमार बिंद यांच्या घरी आला. २३ ऑगस्टच्या रात्री दोघांनी एकत्र जेवण करून झोपले. मध्यरात्री समशेर झोपेतून उठला आणि त्याने स्वयंपाकघरातील चाकून प्रमोद कुमार बिंद यांच्यावर वार करून हत्या केली. यावेळी घरात असलेले ४४ हजार रुपये घेऊन तो पळून गेला. चोरलेले पैसे देखील नंतर तो जुगारात हरला होता. गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, अशोप पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेऱे, मुकेश तटकरे, सागर बावरकर, अश्वीन पाटील आदींच्या पथकाने या अशक्यप्राय वाटणार्‍या गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली.