वसई: विरार पूर्वेच्या टोटाळे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (२४) असे या तरुणाचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अमित मोहिते हा विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात राहत आहे. मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन मिरवणुक ही बुधवारी सकाळी पहाटे पर्यंत सुरू होती. यावेळी अमित हा विसर्जनासाठी विरारच्या टोटाळे तलावात उतरला होता.
याच वेळी अमित याला फिट आली आणि तो पाण्यात पडला. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
First published on: 18-09-2024 at 13:44 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha devotee drowned in the lake during immersion at virar zws