वसई– ग्रामीण भागातील शाळकरी मुलींमध्ये इन्स्टाग्राम, स्नॅपचॅप आदी समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्यातून त्यांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार होत आहेत. पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील १०० शाळांमध्ये राबिवलेल्या समुपदेशानातून ही बाब समोर आली आहे.

शाळकरी मुलींची फसवणूक, लैंगिक अत्याचार होणे आदी प्रकारात वाढ झाली आहे. शाळकरी मुली अज्ञानामुळे प्रियकरासोबत मुली पळून जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी तसेच मुलींमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील शाळांमध्ये समुपदेशनासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ८ तालुक्यातील १०० शाळांध्ये जाणीव संस्थेतर्फे ७ वी ते १० वीच्या मुलांसीठी व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. वयात येणाऱ्या मुलींना धोके कुठले? आकर्षणाला कसे बळी पडू नये? काय काळजी घ्यावी? लैंगिक  छळापासून बचाव कसा करावा? आदीबाबत समुपदेशक मिलिंद पोंक्षे आणि गौरी संख्ये यांनी व्याख्याने दिली. या व्याख्यानानंतर संस्थेने अहवाल तयार केला आहे.

ग्रामीण भागातील मुली इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट आदींच्या वापरामुळे फसवणूक, लैंगिक अत्याचाराला बळी पडत असल्याचे आढळून आले. या समाजमाध्यमावरून झालेली ओळख, त्यातून पळून जाणे, लैंंगिक संबंधाला बळी पडणे, त्यातून गर्भवती राहणे असे प्रकार घडत असल्याचे समुपदेशक पोंक्षे यांनी सांगितले. याशिवाय व्यसनाधिनता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. सिगारेट, दारू तसेच हुक्का पिण्याचे प्रमाण मुलींमध्ये आढळले आहे. मुलींशी बोलते केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलींवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, शेजारी आदींकडून होत असातत. मात्र ती प्रकरणे आई वडिलांकडूनच दडपली जात असतात.

अनेक प्रकरणात न्याय

व्याख्यानानंतर अनेक मुलींनी त्यांच्यावर होणार्‍या लैगिक अत्याचार, छेडछाड तसेच अन्य त्रासाबदद्ल माहिती दिली. पालघर पोलिसांनी संबंधीत पोलीस ठाण्यामार्पत या तक्रारींचे निवारण करून मुलींची त्रासापासून सुटका केली.

करियरकडे लक्ष देण्याचे आवाहन जाणी संस्थेने राज्य भरातील शाळांमध्ये १ हजार ७० व्याख्याने दिली आहेत. या  व्याख्यानातून मुलींना करियरकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. या वयात आकर्षण आणि शारिरीक स्पर्शामुळे सवय लागले आणि मुलीची शैक्षणिक करियर उध्वस्त होत असल्याचे आढळून आल्याचे पोंक्षे यांनी सांगतिले.

Story img Loader