एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये ४४.६ टक्क्यांनी घसरण; वसई-विरार शहरातील ९० टक्के रुग्ण करोनामुक्त
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई : मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णवाढीचा आलेख घसरू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या असून त्यात फक्त १०.२२ टक्के इतके रुग्ण हे सकारात्मक आढळून आले आहेत. त्यामुळे ४४.६० टक्क्यांनी यात घसरण झाली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका वसई-विरार शहराला बसला होता. विविध ठिकाणच्या भागांतून करोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक होता. दिवसाला सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याची सुरुवात होताच पालिकेने रुग्णवाढ नियंत्रित करण्यासाठी करोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. एप्रिल महिन्यात ३६ हजार ५०३ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील २० हजार ११ रुग्ण हे सकारात्मक आढळून आले होते. म्हणजेच ५४. ८२ टक्के इतके या रुग्णवाढीचे प्रमाण होते.
परंतु मे महिन्यात ३ ते ३० मे या दरम्यान ९२ हजार ७८८ इतक्या करोना चाचण्या केल्या आहेत. यात ९ हजार ४८८ रुग्ण सकारात्मक आढळून आले आहेत. मे महिन्यात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. त्यातही रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे केवळ १०.२२ टक्के इतकेच आहे. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णवाढीच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. ४४. ६० टक्क्यांनी ही घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना हळूहळू मोठा दिलासा मिळू लागला आहे. त्यातच दुसरीकडे मे महिन्यात करोनावाढीचे प्रमाण कमी होत असतानाच करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यात ३ ते ३० मे पर्यंत १५ हजार ४६५ इतके रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरातील ९०.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ३ हजार ९९१ रुग्ण करोनामुक्त झाले त्या वेळी करोनामुक्तांची आकडेवारी ७८.८५ टक्के होती. दुसऱ्या आठवडय़ात हीच आकडेवारी ८२.८३ टक्के, तिसऱ्या आठवडय़ात ८७.७३ टक्के तर चौथ्या आठवडय़ात ही ९०.९९ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. शहरात आढळून आलेल्या ६४ हजार ८७७ रुग्णांपैकी ५९ हजार ३६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार ३३३ जणांचा बळी गेला असून अजूनही ४ हजार ५०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.