सुहास बिऱ्हाडे
वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरातील गुन्हेगारींमध्ये घट असली तरी सायबर गुन्हेगारी तिपटीने वाढली आहे. भविष्यातही असे गुन्हे वाढत जाणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, असले तरी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
स्मार्ट फोनद्वारे ऑनलाइन व्यवहार वाढले तेव्हा त्याचे धोके वर्तविण्यात येऊ लागले होते. त्यावेळी तज्ज्ञांनी इशारा दिला होता की, आता रस्त्यात तुम्हाला गाठून कुणी चाकूचा धाक दाखवून लुटणार नाही, तर ऑनलाइनच्या माध्यमातून थेट मोबाइल, लॅपटॉप, अॅपद्वारे आपल्या बँक खात्यातील रक्कम काढून घेणार आहे. हा इशारा आता खरा ठरू लागला आहे. केवळ आर्थिक नव्हे, तर बदनामीकारक मजकूर ते लैंगिक छळापर्यंतचे प्रकारही सायबर गुन्हेगारीत मोडत आहेत. वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीच्या तक्रारी वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे.
मीरा-भाईंदर वसई विरार-पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे, ही दिलासादायक बाब असली तरी मात्र, दुसरीकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तिपटीने वाढले आहे. २०२१ मध्ये सायबर गुन्हे कक्षाकडे ७९४ तक्रारी, तर २०२२ मध्ये दोन हजार ७३८ एवढय़ा तक्रारी आल्या होत्या. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, डॉक्टर, वकील, बँक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आहेत.
राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ५० हजार ३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात उत्तर प्रदेश अग्रेसर आहे. त्यानंतर कर्नाटकचा दुसरा, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. २०२० मध्ये महाराष्ट्रात पाच हजार ४९६ गुन्ह्यांची नोंद आहे. एकूण गुन्ह्यांपैकी १०.९८ टक्के गुन्हे हे सायबर गुन्हे आहेत.
समाज माध्यमावरील विविध व्यासपीठांवरून अश्लील छायाचित्रे प्रसारित करणे, बनावट खाते उघडून बदनामी करणे, खंडणी उकळणे आदी प्रकार होत आहेत. डिजिटल युग आणि स्मार्ट फोनचा वापर वाढल्यानंतर सायबर भामटे सक्रिय झाले आहेत. ज्या वेगाने या डिजिटल माध्यमांचा वापर वाढू लागला आहे, त्याच वेगाने सायबर भामटय़ांमार्फत फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत.
सायबर भामटे मुख्यत चार मार्गानी नागरिकांचे पैसे खात्यातून लंपास करतात. त्यातील पहिला म्हणजे ई-कॉमर्स संकेतस्थळांवर पैसे वळवले जातात. डमी ऑर्डरने ते कंपनीकडे व्यवहार करतात आणि फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे येताच ते काढून घेतात. यामुळे ते कधी पकडले जात नाहीत. दुसऱ्या प्रकारात ‘पेमेंट गेटवे’च्या माध्यमातून पैसे वळवले जातात. तिसऱ्या प्रकारात मनोरंजन, खेळ (गेिमग)च्या संकेतस्थळावरून पैसे वळविण्यात येतात. तर, चौथ्या प्रकारात थेट बँकेतून काढून युपीआयद्वारे दुसऱ्या बँक वळवले जातात. परंतु, तत्काळ संबंधित कंपनीशी संपर्क करून व्यवहार थांबवून ते पैसे नागरिकांना परत मिळवून देता येतात. मात्र, जेव्हा पैसे दुसऱ्या खात्यात जातात तेव्हा कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. त्याला विलंब लागतो. त्यामुळे गुन्हा घडला की तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. त्या वेळेला ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.
त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांकडून नेहमीच करण्यात येते.
जागरूकता आहे का?
ऑनलाइन फसवणूक झाल्याची बाब उशिरा नागरिकांच्या लक्षात येते. अनेक प्रकरणात ठकसेन वारंवार विविध प्रलोभन दाखवून वारंवार पैसे भरायला लावतात. त्यामुळे नागरिकांनी सावध असणे गरजेचे आहे. ऑनलाइन कर्जाचे अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची पडताळणी करावी, फोनवरून कोणताही अनोळखी व्यक्तीस क्रेडीट कार्ड आणि बँकेशी संबंधित माहिती देऊ नये. ओटीपी सांगू नये. क्रेडीट कार्डद्वारे व्यवहार करताना त्याची माहिती कुठेही सेव्ह करू नये. क्रेडीट कार्ड वापरकर्त्यांने व्यवहाराचे प्रत्येक लघुसंदेश (एसएमएस) तपासावे. त्यामध्ये काही अनियमितता असल्यास तत्काळ संबंधित बँक व सायबर कक्षाकडे तक्रार करावी.
सायबर कार्यालय दूर ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली की नागरिक स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करतात. मात्र स्थानिक पोलीस तक्रारी घेत नाहीत किंवा सायबर कक्षाकडे जाण्याचा सल्ला देतात. पोलीस आयुक्लायाचे सायबर कार्यालय लांब असल्याने सामान्य नागरिकांना त्याबाबत माहिती नसते. त्याबाबत ते अनभिज्ञ असतात. त्यामुळे २४ तासांचा कालावधी निघून जातो आणि मग हे फसवणूक केलेले पैसे परत मिळविण्यात अडचणी येतात.