वसई : वसई विरार शहरात गुजरात राज्यातील सोनसाखळी चोर सक्रीय झाले आहेत. मागील महिन्यात एकाच दिवसात दोन सोनसाखळी चोरीच्या घटनांचा छडा वालीव आणि माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने लावला असून गुजरातमधील कुख्यात चोर कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी याला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे.

शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी वसईत एकाच दिवसात दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे प्रज्ञा वाडिया (५३) या महिलेच्या गळ्यातून दुचकावीरून जाणार्‍या दोन तरूणांनी त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. काही अंतरावरच असलेल्या गोखिवरे तलाव रोड येथे दुसरी घटना घडली.उर्मिला वापीवाला (७०) या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट समोरून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ जाऊन मोटारसायकल थांबवली आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना त्या पत्ता सांगत असताना दोघांना त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याच्या धातूची साखळी खेचून पळ काढला. या प्रकरणी वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी माणिकपूर आणि वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुजरातमधील कुप्रसिध्द कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी (४५) याला गुजराथच्या हिंमतनगर येथे पाठलाग करून अटक केली. त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार मोहम्मद शरीफ खान (५४) याला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला १ लाख ९० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

हेही वाचा : वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप

अवघ्या ५ मिनिटात केल्या दोन चोर्‍या

कन्नुभाई उर्फ कन्हैय्या सोलंकी हा गुजरातमधील कुख्यात चोर असून त्याची टोळी आहे. त्याच्याविरोधात अहमदाबा, साबरकाठा, सुरत आदी विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात ७ गुन्ह्यांची नोंद आहे. तर त्याचा साथीदार मोहम्मद खान याच्यावर वांद्रे आणि गुजरातमधील उमरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी दिली. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Story img Loader