लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई: पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी वेठबिगार कामगारांची भिवंडी चिंबीपाडा येथील एका वीट व्यावसायिकाने छळवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणून यातून ११ नागरिकांची सुटका केली आहे. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा परिसरातील एका वीट व्यवसायिकाने पालघर जिल्ह्याच्या डहाणू, जव्हार, शिल्लोत्तर वाडा या भागातील मजूर आपल्या वीटभट्टीवर कामासाठी बोलावून घेतले होते. मात्र कामावर आलेल्या आदिवासी कातकरी कामगारांकडून छळवणूक करून काम करवून घेत होता.
तर काही कामगारांना त्यांना जबरदस्तीने कामावर उचलून आणून कामासाठी ठेवले होते. शिवराळ भाषेत कामगारांना दादागिरी व दमदाटी करणे, मारहाण करणे, नाममात्र पैसे देऊन त्यांच्याकडून काम करवून घेणे असे प्रकार करीत असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. मागील तीन वर्षांपासून असा प्रकार सुरू होता. हे प्रकरण श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच कार्यकर्ते व पोलीस यांच्या मदतीने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
आणखी वाचा-विरारमध्ये पतंग उडविताना दुर्घटना, १३ वर्षाच्या मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू
यात सुमारे ११ आदिवासी कातकरी समाजाच्या कामगार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.सुनील भोये, सुनीता वाघे, दीपाली पवार, मंजि सवरा, संगीता नडगे, मंदा हडळ, नामदेव वाघे, सविता वाघे, सविता पारधी, अंकुश वाघे, लक्ष्मी सवरा अशी सुटका करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. याप्रकरणी वीट भट्टी मालक सिद्धकी यांच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात छळवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वीट भट्टी मालक व त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत.
असे झाले प्रकरण उघड
जव्हार तालुक्यातील एका नवरा बायकोने वीट भट्टी मालक सिद्धीकी यांच्याकडून वीट थापण्याच्या कामासाठी बयाणा (आगाऊ पैसे) घेतला होता .परंतु ते कामावर न आल्याने सिद्दीकी हा त्यांच्या घरी गेला होता .मात्र तेथेही ते न सापडल्याने त्यांच्या घरात असलेल्या मेहुणीला जबरदस्तीने भट्टीवर आणले .याबाबत जव्हार पोलिसांत वरील नवरा बायको कडून तक्रार दाखल केल्यानंतर मेहुणीने मी स्वतः भट्टीवर आले असल्याचा जवाब दिल्याने ते प्रकरण मिटले होते.
आणखी वाचा-नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी अंमली पदार्थ तस्करी, दीड कोटींचे अंमली पदार्थ जप्त
जव्हार मधील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या मुख्य कार्यालयात या प्रकरणात गडबड असल्याचे कळवले होते .त्यानुसार संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने चिंबीपाडा येथील भट्टीवर प्रत्यक्ष जाऊन तेथील स्थिती पहिली असता काम करणाऱ्या मजुरांनी त्यांची व्यथा सांगितली त्यावरून आदिवासी कातकरी वेठबिगार कामगारांची सुटका करण्यात आली. सद्यस्थितीत हे सर्व कामगार उसगाव येथे आश्रम गृहात आहेत.