वसई: वसई विरार महापालिकेच्या सातिवली येथील माताबाल संगोपन केंद्रात प्रसूतीसाठी येणार्‍या गरोदर महिलांच्या आरोग्य धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी अचानक रुग्णालयाला भेट दिली. या केंद्रात सोनोग्राफी यंत्रणा नसून औषधे देखील बाहेरून आणावी लागत असल्याचे उघड झाले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूनंतर रुग्णालयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्मांण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी दुपारी वसई विरार महापालिकेच्या सातिवली येथील माता बालसंगोपन केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची व्यवस्था, तेथे असणार्‍या सोयीसुविधा आदींची पाहणी केली. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. गरोदर महिलांना शस्त्रिक्रियेद्वारे होणार्‍या (सिझेरियन) प्रसूतीसाठी लागणारे सुचर साहित्य निकृष्ट असल्याचे आढळून आले. त्यातही मे महिन्यापासून ठेकेदाराने नवीन सुचर साहित्य पुरवलेलं नाही. या निकृष्ट सुचर साहित्यामुळे गरोदर महिलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो असे गावित यांनी सांगितले.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?
Seven developers application to government for withdrawal from SEZ project print eco news
सात विकासकांचा ‘सेझ’ प्रकल्पातून माघारीचा सरकारकडे अर्ज; पुणे, नागपूरच्या प्रकल्पांचाही समावेश

हेही वाचा >>>वसई विरार शहरातील लॅब मधील रुग्णांच्या आरोग्याशी खेळ; मान्यता रद्द झालेल्या डॉक्टरकडून दिले जात आहेत वैद्यकीय अहवाल

रुग्णालयात मूलभुत सोयीसुविधांचा अभाव

खासदार गावित यांनी रुग्णालयात फिरून व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पाहणी केली. रुग्णांनी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयात पुरेसी औषधे नसल्याचे आढळून आले. रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. गरोदर महिलांच्या तपासणी साठी सोनोग्राफी यंत्र असणे अत्यावश्यक आहे. मात्र ते देखील रुग्णालयात नाही. त्यामुळे तपासणीसाठी महिलांना खासगी केंद्रांकडे जावे लागतो. औषधे आणि तपासणीचा भुर्दंड रुग्णांना बसत असतो. पालिकेची आरोग्य सेवा मोफत आहे. तरी देखील येथील सर्वसामान्य रुग्णांना हा आर्थिक फटका सहन करावा लागतो याबाबत खासदार गावित यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य शासन विविध योजना राबवते, अनुदान देत असते. परंतु पालिकेच्या स्तरावर त्या रुग्णालयामंधील रुग्णालयांना मिळत नसल्याचे ते म्हणाले. रुग्णालयाती सर्व डॉक्टर ठेका कर्मचारी असल्याने ते स्वत: सुरक्षित नसल्याने चांगली सेवा देऊ शकत नाही असेही ते म्हणाले.

पालिका रुग्णालयाती दुरवस्थेबाबत खासदार गावित यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क केला आणि माहिती दिली.  निकृष्ट साहित्य पुरविणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आयुक्तांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले

याबाबत सातिवली येथील माता बाल संगोपन केंद्राच्या प्रमुख डॉ अनुपमा राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसुतीसाठी लागणारे साहित्य निकृष्ट असल्याचे मान्य केले. महिन्याला या केंद्रात सरासरी ३८० प्रसूती होत असतात. त्यापैकी ६० ते ६५ या शस्त्रक्रियेद्वारे होतात. त्यासाठी हे सुचर साहित्य लागते. ते नसल्याने रुग्णांना बाहेरून साहित्य आणावे लागते असे त्या म्हणाल्या. सोनोग्राफी यंत्र लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे असे त्यांची सांगितले. मात्र रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा असल्याचा दावा त्यांनी केला. खासदारांच्या या अचानक दिलेल्या भेटीमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडालेली दिसून आली.