वसई: पालघर जिल्ह्यासह वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संतधार सुरूच आहे. तर दुसरीकडे वसई विरार भागातून गेलेल्या नद्याही ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यात वसई पूर्वेच्या भागातील पांढरतारा पूलही पाण्याखाली गेल्याने नजीकच्या गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे.

वसई विरार शहरात शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा पावसाचा जोर कायम राहिला आहे. डोंगर परिसर असलेल्या भागात पाऊस कोसळत असल्याने वसईच्या भागातून गेलेल्या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. तानसा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने भाताणे उसगाव मार्गावरील पांढरतारा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील तानसा पलीकडच्या अनेक गाव पाडे व वस्त्यांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना आता लांबपल्ल्याच्या भालीवली गावातून जाणारा रस्ता व सायवन मेढे पूल असा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. रिपरिप सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूणच नदी नाल्यांच्या लगतच्या भागात राहणाऱ्या राहिवाशीयांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. वसई विरार शहरातील अनेक ठिकाणच्या सखल भागात सलग दुसऱ्या दिवशीही पाणी साचून राहिल्याचे चित्र दिसून आले आहे. आतापर्यंत वसईत १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती तहसील विभागाने दिली.

bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
Roads in Nashik under water due to heavy rain
अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात
Sindhudurg, Fishing boat accident,
सिंधुदुर्ग : मासेमारीला गेलेली नौका दुर्घटनाग्रस्त, तिघांचा बुडून मृत्यू
gang, police, Pune, gang attacked police,
पुणे : किरकोळ कारणातून टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
An inmate attacked another inmate in Aadharwadi Jail in Kalyan
कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला

हेही वाचा – नागपुरात पाऊस; भिंत पडली, गोसेखुर्दचे पाच दरवाजे उघडले

हेही वाचा – सरकारी खर्चाने ‘तीर्थस्थळ दर्शन’योजनेसाठी कोण ठरणार पात्र ?

विरारमध्ये खोलीची भिंत कोसळली

विरार पूर्वेच्या कारगिल नगर येथील जयदीप शाळेमागील नाल्याशेजारी अनेक अनधिकृत चाळी वसलेल्या आहेत. शनिवारी व रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याशेजारी असलेली १५ वर्षे जुनी एका खोलीची भिंत ढासळून नाल्यात कोसळली. या खोलीत कोणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या घडलेल्या दुर्घटनेच्या ठिकाणची पालिकेने पाहणी केली आहे.