लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर  वाहून नेणाऱ्या ट्रक उलटून अपघात घडला आहे. या अपघातानंतर रात्री तीन वाजल्यापासूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटर लांब लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मागील सहा ते सात तास वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Traffic jam on both lanes due to track closure on highway
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
thane accident on old Kasara Ghat on Mumbai Nashik highway containers overturned
जुन्या कसारा घाटात अपघात, वाहनांच्या रांगा
Jammu Kashmir Truck Accident
Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू
Three dead in car accident on chandrapur nagpur road
चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. शनिवारी गुजरात वाहिनीवर हायड्रोजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला आहे. यात संपूर्ण सिलेंडर रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री तीन वाजल्यापासून मुंबई व गुजरात या दोन्ही वाहिनीवर वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण झाली आहे सुमारे ८ ते १० किलोमीटर इतक्या लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे.

आणखी वाचा-महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला, वसई फाट्याजवळ पहाटे झाला अपघात

या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना सहा ते सात तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. या महामार्ग वाहतूक पोलीस व वसई वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शहरांतर्गत रस्त्यावरही कोंडी

या वाहतूक कोंडीचा परिणाम हा शहराला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर झाला. सातीवली, वसईफाटा, नायगाव अशा ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. नायगाव पूर्वेच्या बापाणे फाटा येथेही वाहतूक कोंडी झाल्याने नायगाव पोलिसांनी टीवरी फाट्यावरून वाहनांची वाहतूक वळविली होती.

Story img Loader