लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: ‘लव्ह जिहाद आणि लँड जिहाद’ कायद्याच्या मागणीसाठी हिंदूत्ववादी संघटनांकडून मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला होता.यात हिंदूवादी संघटनेसह भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले होते. 

लव्ह जिहाद आणि धर्मातर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे राज्यभर सध्या आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी मीरा भाईंदरच्या मुख्य मार्गांवर मोर्चा काढण्यात आला होता. सध्या लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. हिंदू मुलींचे धर्मातर करून फसवणूक व शोषण केले जात आहे.याच शिवाय हिंदू लोकांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कब्जा केला जात आहे.त्यामुळे याविरोधात काही हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा आयोजित केला होता.

आणखी वाचा- विरार- बोळींजमधील म्हाडा वसाहतीतील पाण्याचा प्रश्न सुटणार; वसई-विरार महानगरपालिकेचे आश्वासन

यामध्ये भाजप आमदार नितेश राणे, आमदार गीता जैन,माजी आमदार नरेंद्र मेहता,समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेली काजल हिंदुस्थानी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी गळय़ात भगवे शेले आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. याचसोबत मोर्चात हातात भगवे झेंडे आणि लव्ह जिहाद आणि धर्मातराच्या विरोधातील मजकूर असलेले फलक होते आणि सातत्याने ‘जय श्री राम’चा नारा दिला जात होता.

Story img Loader