वसई- रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास ती पुरविण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालये आणि सुश्रुषागृहांची आहे. त्यासाठी रुग्लणालयांनी खासगी रक्तपेढीशी संलग्न राहणे राहण्याचे आदेश वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभाने दिले आहेत. याशिवाय रक्त टंचाईवर मात करण्यासाठी खासगी रुग्णलायांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासही सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर रक्त टंचाई निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच रक्ताची व्यवस्था करण्यास सांगण्यात येत असते. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक हवालदील होत आहे. रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे. असे असताना काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करायला सांगत असतात. याची गंभीर दखल पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. पालिकेने सर्व खासगी रुग्णालये तसेच सुश्रुषागृहांना नोटीसा काढून रक्तपेढीशी संलग्न होण्याचे आणि रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – वर्सोवा-विरार सागरी सेतू : मच्छिमारांचे मने वळविण्यासाठी एमएमआरडीएचे मत्स्य व्यवसाय विभागाला साकडे

महाराष्ट्र (बॉम्बे) नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ व महाराष्ट्र (बॉम्बे) होम रजिस्ट्रेशन नोंदणी नियम २०२१ च्या अधिसूचनेतील ११ (एन) नियमानुसार रुग्णांच्या रक्त पुरवठ्यासाठी संबधित सुश्रुषागृह परवानाधारक रक्तपेढीशी संलग्न असणे आवश्यक आहे. जेव्हा रुग्णाला रक्त संक्रमणाची आवश्यकता असेल त्याचवेळी त्याला रक्त उपलब्ध करून देणे ही सुश्रुषागृहाची जबाबदारी आहे, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – रेल्वेत वाढती गुन्हेगारी; मीरारोड वैतरणा स्थानकादरम्यान वर्षभरात १०९८ गुन्हे

रक्तदान शिबिरांचे आयोजन करा

शहरात निर्माण झालेल्या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने उपायोयजना करण्यास सुरवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून सर्व खासगी रुग्णालये आणि सुश्रुषागृहांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. रक्तदानाविषयी जनजागृती करावी तसेच यासंदर्भातील अहवाल पालिकेला सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.