वसई– वसई- भाईंदर रोरो सेवेला आठवडा पूर्ण झाला असून नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना या रोरो सेवेचा अधिकाअधिक लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी कर पुढील एक वर्षासाठी माफ केला आहे. त्यामुळे वाजवी दरात नागरिकांना रोरो सेवेचा आनंद घेता येणार आहे.

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे.  सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस या कंपनी मार्फत रोरे ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. २० फेब्रुवारी पासून ही सेवा सुरू झाली असून त्याला आठवडा पूर्ण झाला आहे. या सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
nashik district 107 criminals
नाशिक : जिल्ह्यातील १०७ गुन्हेगारांना मतदार संघात प्रवेशास मनाई
pm narendra modi rally
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित
20 criminals tadipar nashik
नाशिक : परिमंडळ दोन अंतर्गत २० गुन्हेगार तडीपार
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले

हेही वाचा >>>भाईंदरच्या आझाद नगर मध्ये झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

पर्यटनाला चालना मिळावी आणि अधिकाअधिक नागरिकांना या सेवेचा उपभोग घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने या रोरो सेवेचा प्रवासी कर यापूर्वीच माफ केला आहे. त्यामुळे २०२४ या वर्षात प्रवाशांवर रोरो सेवेचा प्रवासी कर नसल्याने वाजवी दरात ही सेवा मिळणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. सध्या ही सेवा पुढील ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार बदल करून नंतर पूर्ण क्षमतेने सेवा दिली जाणार आहे.