वसई: नायगाव पूर्वेच्या रेती बंदराजवळ मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कवटी आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी होती. पोलिसांनी हाडांची जुळवाजुळव करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहे. हाडांचा सापळा असल्याने तो पुरुषाचा आहे की महिलेचा ते स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – वसईत वाहतूक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वार फरार, पोलिसांकडून शोध सुरू
हेही वाचा – वसईत गॅस गळती, एकाच घरातील तिघांचा मृत्यू
नायगाव पूर्वेला रेतीबंदर असून तेथे तिवरांची झाडे आहेत. रविवारी सकाळी लघुशंकेसाठी गेलेल्या एका इसमाला झुडपात एक मानवी कवटी आढळून आली. त्याच्याच काही अंतरावर हाडांचा सापळा आढळला. त्याने तत्काळ याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हाडांचे अवशेष गोळा केले असून ते न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले आहेत. अहवालानंतर हत्या आहे की अपघाती मृत्यू ते स्पष्ट होईल, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश धायगुडे यांनी दिली आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.