विरार पोलिसांनी केलेल्या दमदाटीमुळे आत्महत्या करणार्‍या अभय पालशेतकरच्या आईला १० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. २१ एप्रिल रोजी अभयने आत्महत्या करण्यापूर्वी चित्रफित तयार करून पोलिसांनी धमकी दिल्याचे सांगितले होते.

विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय पालशेतकर (२८) हा पत्नी आरोही पालशेतकर (२५) हिच्यासोबत रहात होता. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. २१ एप्रिल रोजी त्याच्या पत्नीने अभय विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अभयला बोलावून १४९ अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती. घरी आल्यावर अभयने घरातील हॉलच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रिफत तयार करून नातेवाईकांना पाठवली. सुनिल पवार नामक पोलिसाने टायर मध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे या चित्रफितीत त्याने सांगितले होते. परंतु विरार पोलिसांनी फक्त अभयच्या पत्नीवरच गुन्हा दाखल केला आणि पोलिसांची फक्त विभाागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पोलिसाला सोयीस्कररित्या वाचवले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे माध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे राज्याच्या मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आयोगाने पोलीस आयुक्तांना यासंदर्भात नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले होते.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Akshara Singh Death Threat
“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

हे ही वाचा… भाईंदर : पालिका बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, संतप्त नागरिकांची बसची तोडफोड

सुनावणीनंतर आयोगाने पोलिसांच्या कृतीला दोषी ठरवले आहे. पोलिसांनी केलेली दमदाटी आणि धमकी हे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मयत अभयची आई उज्वला पालशेकर यांना ६ आठवड्याच्या आत १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जर या कालावधीत नुकसान भरपाई दिली नाही तर ८ टक्के व्याज दराने ती द्यावी लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. एम.ए.सईद आणि के.के.तातेड यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहे.

हे ही वाचा… मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे मागितली पाच लाखांची खंडणी, भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याशिवाय पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दर तीन महिन्यात कार्यशाळा आयोजित कऱण्याचे आदेशही राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मागील आठवड्यातच आयोगाने चावी विक्रेता मोह्ममद अली अहमद अली अन्सारी (३५) यालामाणिकपूर पोलिसांनी मारहाण केल्याप्रकऱणी ३ लाखांचा दंड ठोठावला होता.