२२ हजार बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

भाईंदर : मीरा – भाईंदर शहरात व्यवसाय करत असलेल्या रिक्षा चालकांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याकरिता वाहतूक पोलिसांकडून चालक ओळखपत्र नोंदणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ५ हजार रिक्षा चालकांना ओळखपत्र देण्यात आले आहे. मात्र अदयापही १० हजार ५०० रिक्षा चालकांची नोंदणी करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर उभे आहे.

Dates for each police station to record statement of victims in POCSO
पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Ladki bahin yojna Criticism of bank employees Maharashtra State Government
लाडक्या बहिणींनो, याचा जरूर विचार करा!
fir against 25 including four companies in 35 crore fraud of 214 investors
२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
cyber crime
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक
MSRDC letter to Mumbai Municipal Corporation regarding revenue Mumbai news
५० टक्के महसुलास नकार; ‘एमएसआरडीसी’चे मुंबई महानगरपालिकेला पत्र
Anti-bribery team arrested a land tax assessor who accepted a bribe of 60 thousands
लाचखोरीविरुद्ध लावलेली भीत्तीपत्रके फाडणाऱ्या कार्यालयातच ६० हजारांची लाच…

मीरा-भाईंदर शहरात दळणवळण करण्याकरिता नागरिक मोठय़ा संख्येने रिक्षाचा वापर करत आहेत. मात्र अनेक वेळा यात बेशिस्त रिक्षा चालकांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याची तक्रार वाहतूक पोलिसांना करण्यात येत होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्याकरिता शहरातील रिक्षाचालकांची माहिती प्रवाश्नांना सहज उपलब्ध दिल्यास बेशिस्त चालकांवर कारवाई करणे सोपे होईल या हेतूने वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालक ओळखपत्र नोंदणी करण्यात येत आहे. यात वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षा चालकांची व परमिटधारक अशा दोन्ही व्यक्तींची संपूर्ण माहिती घेण्यात येत आहे. या माहितीत दोघांचे नाव, घरचा पत्ता, वाहन क्रमांक, परवाना क्रमांक, परमिट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण माहिती ओळखपत्र स्वरूपात पोलिसांकडून रिक्षामध्ये  रिक्षाचालकाच्या मागील बाजूस लावण्यात येत आहे. या मोहिमेला वाहतूक पोलिसांनी ‘सुरक्षा कार्ड’ असे नाव दिले असून त्यानुसार रिक्षाचालकांची माहिती गोळा करण्यात आहे.

शहरात आरटीओ नोंदीप्रमाणे एकूण १५ हजार ५०० अधिकृत रिक्षा व्यवसाय करत आहे. यापैकी साधारण ५ हजार रिक्षांना ‘सुरक्षा कार्ड’ मोहिमेअंतर्गत ओळखपत्रे दिली असून इतर रिक्षा चालकांची नोंदणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती काशिमीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

६४ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल

मीरा-भाईंदर शहरात कायद्याचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार २०२१ जानेवारीपासून ते आतापर्यंत तब्बल २२ हजार २६५ बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाई मुळे ६४ लाख ३९ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.