वसई : नालासोपाऱ्यात बेकायदेशीर पणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परिणाम हा रिक्षांवर होत आहे. शनिवारी नालासोपाऱ्यात रिक्षा संघटनांनी एकत्र येत रिक्षा बंद आंदोलन केले. या रिक्षा बंद आंदोलनामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

वसई विरार शहराच्या वाढत्या नागरिकरणा पाठोपाठ रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यातच काही कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीर पणे रिक्षा चालवित आहेर. तर दुसरीकडे मॅजिकमधून प्रवासी वाहतुकीला बंदी असतानाही ते ही सर्रास पणे प्रवासी भरून वाहतूक करतात. याशिवाय पालिकेच्या बसेस ही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवितात.असे असतानाही वाहतूक विभाग त्यांच्याकडे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी शनिवारी नालासोपाऱ्यात रिक्षा बंद आंदोलन सुरू केले होते. यात संतोष भवन, धानिवबाग, बिलालपाडा, नालासोपारा फाटा येथील रिक्षा संघटना सहभागी झाल्या होत्या. सकाळी ९ वाजता तुळींज येथून नालासोपारा बस डेपो असा मोर्चा ही काढला होता. यावेळी त्यांनी मॅजिक व बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याऐवजी परवाना धारक रिक्षा चालकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Dangerous transportation of students by vehicle continues in Vasai Possibility of accident
वसईत विद्यार्थ्यांची वाहनातून धोकादायक वाहतूक सुरूच; अपघाताची शक्यता
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle in Marathi
Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !
Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे नालासोपाऱ्यात कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना ताटकळत राहावे लागले तर काही प्रवाशांना पायी प्रवास करीत जावे लागले असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Story img Loader