परिसरातील घरांना तडे, पर्यावरणाची ऱ्हास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई: वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर अभियारण्य परिसरातील पर्यावरण संरक्षित वनक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर दगड खाणी सुरू आहेत. या दगडखाणींमुळे परिसरातील गावांच्या घरांना तडे जात असून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत उपजिल्हाधिकार्यानी वसई तहसीलदारांना स्वयंस्पष्टता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तुंगारेश्वर अभयारण्याला पर्यावरण संरक्षित क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात वन्य प्राणी, पशू पक्षी यांच्या संवर्धनासाठी दगडखाणींना, रासायनिक उद्योगांना परवानगी नाकारली जाते. मात्र त्याचे उल्लंघन करून या परिसरात अनेक बेकायदेशीर दगड खाणी कार्यरत आहेत. शिरगाव खंदरपाडा, कसराळी खिंडमध्ये खाजगी शेतजमिनीत अनधिकृतपणे दगड माती उत्खनन सुरू आहे. हा भाग इको-सेन्सेटीव्ह क्षेत्रात येत असतानाही वन व महसूल अधिकारी व तत्सम शासकीय यंत्रणा, कर्मचारी ह्यांना हाताशी धरून अनधिकृतपणे स्फोटकांचा वापर करून अवैधरीत्या दगड माती उत्खनन केले जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

उत्खननात केल्या जाणाऱ्या स्फोटकांचा वापर आणि ब्लास्टिंग ह्यामुळे शिरगाव गावातील बहुतांश घरांना तडे गेले आहेत. आवाजाची तीव्रता एवढी आहे की घरातील फरशीला (फ्लोरिंगला) तडा जात आहे. यामुळे कधीही घर कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्फोटामुळे गावातील शाळा देखील कोसळली होती. अनेकदा हादरे बसुन शिरगाव(डोंगरीपाडा) येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे जाऊन कोसळली आहेत. शिरगाव-खंदरपाडा मुख्य रस्त्यावरील पुलाच्या नजीकच केलेल्या दगडखाणीतील स्फोटामुळे पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे कधीही सदरचा पूल कोसळून मनुष्य जीवित हानी होऊ शकते. या बाबतीत तत्कालीन तहसीलदार व महानगरपालिका यंत्रणा ह्यांना कित्येक वर्षांपासून कळवण्यात येत आहे. पण कारवाई झाली नाही, असा आरोप जनआंदोलन समिती आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी केला आहे.

स्वयंस्पष्टता अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

या परिसरात अनेक बेकायदेशीर दगडखाणी सुरू आहेत. मांडवी येथील भूमापन क्रमांक ८३ या ठिकाणी सुरू असलेल्या क्रशर मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असा आरोप महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन निलेश पेंढारी यांनी केला आहे. वसईच्या भूमापन क्रमांक ३६ येथे नाझिर खान या इसमाने सुरू केलेल्या बेकायदेशीर दगडखाणीविरोधात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याला नव्याने २०२१ मध्ये परवानगी दिली आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांनी तहसीलदारांना स्वयंस्पष्टता अहवाल सादर करण्याच आदेश दिले आहे.

आरोग्याला धोका, शेतमालाचे नुकसान

विरार पूर्वेच्या शिरगाव परिसर हा मांडवी परिक्षेत्रात येतो. शिरगाव-गडगापाडा येथे भर लोक वस्तीत अनधिकृतरित्या क्रशर प्लांट सुरू असून त्याचा त्रास वस्तीतील,परिसरातील ग्रामस्थांना होत आहे. अनेक रहिवाशांना श्वसनाचे आजार झाले आहेत. अवैधपणे दगड-माती वाहून नेणारे ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून धूळ-मातीमुळे अनेकदा नागरिक-विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनधिकृत दगड-माती वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला, तूर, वाल, चवळी, कडधान्यसारख्या लागवडीचे प्रचंड नुकसान होत आहे.