भाईंदर : एका दाखल गुन्हयाचे प्रकरण बंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या नया नगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस शिपायाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाखाची लाच घेताना अटक केली.
हेही वाचा : वसई: अर्नाळा येथील विसावा रिसॉर्टमध्ये पोहताना तरुणाचा मृत्यू
नया नगर पोलीस ठाण्यात एका तक्रारविरोधात एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित आव्हाळकडे सोपवण्यात आला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी आव्हाळ यांनी तक्रारदाराकडे साडेचार लाखाची मागणी केली होती. तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. लाचेची ही रक्कम पोलीस शिपाई प्रकाश पाटील याच्यामार्फत स्वीकारताना ठाण्याच्या लासलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. सदर कामगिरी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.