भाईंदर : उत्तनच्या येडू कंपाउंड परिसरात सहा वर्षीय मुलाचा पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उत्तन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण हर्षद कॉलर(६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. काशिमीरा येथे राहणारा किरण काही दिवसापूर्वीच आपल्या आईसोबत तो उत्तन येथील येडू कंपाउंड येथे आपल्या आजीकडे राहायला आला होता. बुधवारी सकाळी खेळायला बाहेर गेलला किरण बराच वेळ दिसत नसल्यामुळे त्याची आई शोध घेत होती.यावेळी घराजवळील एका डबक्याच्या शेजारी त्याची चप्पल पडल्याचे दिसून आले.त्यामुळे तो पाण्यात बुडाल्याचा संशय झाल्याने कुटुंबीयांनी याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना

हेही वाचा : बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार

त्यानुसार अग्निशमन विभागाने डबक्यात शोध मोहीम राबवली असता त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर याबाबतची माहिती उत्तन पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या जोशी रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती उत्तन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :विरारमध्ये  २१ वर्षीय तरुण  तलावात बुडाला

महिन्याभरात दुसरी घटना

मिरा भाईंदर महापालिका हद्दीत पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून महिन्याभरात दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या समोर आले. यापूर्वी २२ जुन रोजी पेणकर पाडा भागातील नागरी वस्तीत असलेल्या खड्ड्यात बुडून श्रीयांश मोनू सोनी(५) या मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे.त्यामुळे शहरातील खड्ड्याच्या सुरक्षेबाबतचा गंभीर निर्माण झाला आहे.

Story img Loader