भाईंदर : पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आपल्या हॉटेल व्यवसायाला त्रास देत असल्याचे आरोप भाजपच्या एका माजी नगरसेवकाने केले आहेत. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर जलद गतीने व्हायरल झाली आहे. अरविंद शेट्टी असे या माजी भाजप नगरसेवकाचे नाव आहे. शेट्टी यांचा प्रामुख्याने शहरात हॉटेलचा व्यवसाय आहे. २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. यापूर्वी सरनाईक यांनी महापालिकेवर दबाव टाकून आपले २० वर्ष जुने हॉटेल तोडले होते. तर अनेक वेळा सार्वजनिकरित्या शिवीगाळ केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आता घोडबंदर मार्गांवर असलेल्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सरनाईक पालिकेमार्फत भिंत उभारत असल्याचे त्यांनी आरोप केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बोरिवली-विरार दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन, ५ गावे बाधित होणार, ग्रामस्थांचा आंदोलनाचा पवित्रा

‘या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मदत केली आहे. मात्र तरी देखील सरनाईक जातीने आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे आपल्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मदत करावी’, अशी मागणी अरविंद शेट्टी यांनी समाज माध्यमांवरील फेसबूक लाईव्हवर येऊन केली आहे. यावेळी शेट्टी हे रस्त्यावर अर्ध नग्न अवस्थेत रडत असल्याचे दिसून आले आहेत. “हे प्रकरण काय आहे ते मला माहित नाही. मात्र त्या ठिकाणी पीडब्लूडीच्या जागेत शेट्टी यांचा लेडीज बार आहे. या बारच्या शेजारी रस्ता जात असल्याने शेट्टी हे संतप्त झाले असून दारूच्या नशेत काहीही बडबडत आहेत”, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar bjp former corporator arvind shetty allegations on shivsena mla pratap sarnaik on facebook live css