भाईंदर : मिरा रोड येथील वोक्हार्ड रुग्णालयाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणारा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकाद्वारे रुग्णालयात शोध घेण्यात येत आहे. अद्यापही काही संशयास्पद आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिरा रोड येथील नया नगर भागात वोक्हार्ड रुग्णालय आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास या रुग्णालयाला अज्ञात मेल आला. यामध्ये रुग्णालय बॉम्बने उडवून टाकणार असल्याची धमकी देण्यात आली होती. रुग्णालय व्यवस्थापकाने याबाबतची माहिती त्वरीत नया नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच बॉम्बशोधक पथका मार्फत संपूर्ण रुग्णालयाची तपासणी हाती घेतली आहे. खबरदारीच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन पथकाला देखील घटनास्थळी तैनात केले आहे.
हेही वाचा : नालासोपार्यात ३ अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार, ४ जणांना अटक
रुग्णालयाला आलेल्या मेल आयडीचा आयटी सेल मार्फत शोध घेतला जात आहे. प्रामुख्याने अशा स्वरूपाचे मेल देशातील अन्य काही रुग्णालयांना आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे साधारण ही एक अफवा असण्याची शक्यता असली तरी गांभीर्याने शोध घेतला जात असल्याचे नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले.