भाईंदर : एका सलून चालकाने शाळेची मिनी बस चालविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा ताबा सुटला आणि बस एका वाहनाला धडक देऊन इमारतीत शिरली. सुदैवाने जिवितहानी झाली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिरा रोड येथील पूनम सागर परिसरात रात्री ८ च्या सुमारास एक शाळेच्या बसचा चालक केस कपाण्यासाठी आला होता. त्याने शाळेची बस दुकानाच्या बाहेर उशी केली होती. दरम्यान, रस्त्यावर असलेली ही बस दुसरीकडे हलवण्यासाठी त्याने चावी सलून मध्ये करणार्या अली (२२) नामक कर्मचार्याकडे दिली होती.
हेही वाचा : अर्नाळा किल्ल्यातील समुद्रात २५ फुटांचा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळला
मात्र गाडीवरील त्याचा ताबा सुटला आणि गाडी थेट दुसऱ्या चार चाकी वाहनाला धडक देऊन बाजूलाच असलेल्या ‘ पूनम सागर’ औषध दुकानात शिरली. यावेळी दुकानात तीन कर्मचारी व ग्राहक होते. ते थोडक्यात बचावले. कोणालाही दुखापत झाली नाही.
भाईंदरमधील एका सलून चालकाने शाळेची मिनी बस चालविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा ताबा सुटला आणि बस एका वाहनाला धडक देऊन इमारतीत शिरली. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. pic.twitter.com/3y8jNUms21
— LoksattaLive (@LoksattaLive) June 25, 2024
नागरिकांनी चालकाला चोप देऊन नया नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तो नवखा चालक असून त्याच्याकडे वाहन परवाना देखील नव्हता.