भाईंदर : भाईंदरच्या लाईफलाईन रुग्णालयात कर्मचारी आणि नातेवाईकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर तुफान वायरल होत आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास एक कुटुंबीय महिला रुग्णाला घेऊन चारचाकीने रुग्णालयात आले होते. या प्रसंगी सुरक्षा रक्षकाला मुख्य प्रवेशद्वार उघडण्यास उशीर झाला.त्यामुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकांने थेट सुरक्षारक्षकाला कानाखाली मारली.दरम्यान सुरक्षा रक्षकाने त्यावेळी विरोध न करता प्रथम रुग्णाला रुग्णालयात घेतले. मात्र नंतर हा सर्व प्रकार आपल्या सहकाऱ्यांना सांगितला.
हेही वाचा : वसई: बलात्काराच्या तक्रारीनंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष फरार, पक्षाने केली पदावरून हकालपट्टी
यावरून संतप्त झालेल्या इतर कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहनाची तोडफोड केली. परिणामी कर्मचारी विरुद्ध नातेवाईक असा वाद उभा राहिला. याबाबतची माहिती मिळताच नया नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात दोषीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती नया नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd