भाईंदर: क्षुल्लक वादातून रुग्णाच्या नातेवाईला माराहण करून त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकऱणी नया नगर पोलिसांनी रुग्णालयाच्या डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी मिळून एकूण २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोहेल झेंडे (२७) हा तरुण मंगळवारी आपल्या आईला मिरा रोड येथील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र सुरक्षा रक्षकाने मुख्य प्रवेशद्वार उघडण्यास उशीर केला. त्यावरून सोहेल आणि सुरक्षा रक्षकात वाद झाला. या वादाता सोहेलने सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली. यामुळे संतप्त झालेल्या सुरक्षा रक्षकासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोहेल याच्या वाहनाची तोडफोड केली. रुग्ण नातेवाईक आणि रुग्णालय कर्मचारी यामध्ये वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : वसई: अल्पवयीन मुलीचे ८ वर्ष लैंगिक शोषण, नालासोपाऱ्यातील डॉक्टर योगेंद्र शुक्ला याला अटक
याप्रकरणी मंगळवारी रात्री सोहेल झेडे याने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून नया नगर पोलिसांनी रुग्णालयाच्या डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी मिळून एकूण २० ते २५ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९, (२), १९१ (२),११५(२), ३५२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.