भाईंदर : भाईंदर मध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेन खाली चिरडून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिला नेहमी प्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली होती. याप्रकरणी नवघर पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. अद्यापही महिलेची ओळख पोलिसांना पटलेली नाही. मात्र ती भाईंदरच्या बी पी रोडची रहिवासी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. बुधवारी सायंकाळी ही महिला फॅमिली केअर हॉस्पिटलच्या चौकात उभी होती. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका क्रेन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन तीच्या अंगावर गेले. यात चाका खाली येऊन महिलेचे डोकं पूर्णतः चिरडून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यात पोलिसांनी ट्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

हेही वाचा : माहिती अधिकारात माहिती नाकारली, विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या

मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवृत्त कर्मचारी आहे. घर बसल्या कंटाळा आल्यावर ती फेरफटका मारायला या परिसरात येत होती. या अपघाताच्या घटनेनंतर काही काळ या रस्त्यावर नागरिकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती.