भाईंदर : स्काय वॉकला लावण्यात आलेला पत्रा कोसळून खालून जाणारी एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. गुरूवारी संध्याकाळी मिरा रोड येथे ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पत्रा लावणारे आणि त्याची डागडुजी करणार्‍यांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नियती चौबड (१९) ही तरुणी मिरा रोड पूर्वेच्या कनकिया परिसरात राहते. ती मिरा रोड येथील गुरूकुल स्पोर्टस ॲण्ड करियर अकादमी मध्ये पोलीस भरतीच्या सरावासाठी जात असते. गुरूवारी संध्याकाखील साडेचारच्या सुमारास मिरा रोड येथील स्कायवॉकच्या खालून ती नेहमीप्रमाणे अकादमीत जात असताना पोस्ट ऑफिस समोर असलेल्या स्कायव वॉकला लावलेला पत्रा तिच्या डोक्यावर आदळला. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत.

हेही वाचा : वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

स्कायवॉकला लावण्यात आलेले पत्रे योग्य पध्दतीने लावण्यात आले नव्हते. या कामात निष्काळजीपणा करण्यात आला होता. त्यामुळे नया नगर पोलिसांनी पत्रा लावणारे आणि त्याची डागडुजी करणार्‍यांविरोधात कलम ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.