वसई: नालासोपारा पश्चिमेच्या खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. यातून तीन जणांची सुखरूप सुटका केली आहे तर एक जण जखमी झाला आहे. नालासोपारा पश्चिमेच्या भागात खंबाळेश्वर मंदिर जवळील चौधरीवाडी येथे दोन मजली इमारत आहेत. शनिवारी रात्री अचानकपणे या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप

याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन इमारतीमध्ये अडकून असलेल्या सुप्रिया सुरेश मचेकर (४५), गंधर्व सुरेश मचेकर(९), दृष्टी सिंग (२८) अशा तीन जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. तर या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला आहे. राहुल मंदन सिंग असे या व्यक्तीचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.