लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्‍या शिक्षिकेने १० वर्षाच्या मुलीच्या कानाखाली मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या श्वसनलिकेसह मेंदूला ईजा झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मागील ८ दिवसांपासून ती कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत आहे.

mira bhayandar bjp president announces narendra mehta as candidate for assembly elections
Maharashtra Election 2024 : मिरा भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष तर्फे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाची परस्पर घोषणा !
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
sakshi malik on brij bhushan singh
Sakshi Malik: ‘भाजपा नेत्या बबिता फोगट यांनीच रचलं कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं षडयंत्र’, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!

नालासोपारा पूर्वेच्या ओस्वाल नगरी येथील अंबाराम पटेल (३२) हे किराणा दुकान चालवतात. त्यांची १० वर्षांचा मुलगी दिपिका ५ व्या इयत्तेत शिकते. याच परिसरात असलेल्या रिना क्लासेसमध्ये दिपिका खासगी शिकवणीसाठी जाते. ५ ऑक्टोबर रोजी ती वर्गात मस्ती करत असल्याने शिकवणी घेणारी शिक्षिका रत्ना सिंग (२०) हिने दिपिकाच्या उजव्या कानाखाली हाताने जोरदार थप्पड मारली. यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील भाग कानाच्या पाठीमागील बाजूस लागून दुखापत झाली. या मारहाणीमुळे दिपिकाचे तोडं बंद झाले आणि कान सुजून दुखत होता. सुरवातीला तिला विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुखणे वाढल्याने तिला १३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक

दिपिका कृत्रिम श्वसनयंत्रणेवर उपचार

याबाबत दिपिकाचे वडील अंबाराम यांनी सांगितले की, माझ्या मुलीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. ती कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) आहे. तिला दिवसाला उपचाराचा २५ हजार खर्च आहे. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही सामाजिक संस्थाकडे मदत मागत आहोत. माझ्या मुलीला मारहाण करणार्‍या शिक्षिकेवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात रत्ना सिंग विरोधात कलम १२५(अ) (ब) तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदाच्या अधिनिमय ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही संबंधिक शिक्षिकेला नोटीस पाठवली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद वायंकरणकर यांनी दिली.