वसई : परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्‍यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात २५ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक केली आहे. मागील महिन्यात ११ घरमालकांविरोधात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे. विविध राज्यातील तसेच परदेशी नागरिक देखील विविध कारणांसाठी शहरात वास्तव्यासाठी येत आहेत. परदेशी नागरिकांमध्ये नायजेरीयन, बांग्लादेशी आणि इतर आफ्रिकन देशातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणाता परदेशी नागरिकांचा सहभाग आढळून आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ते देशात प्रवेश करून वास्तव्य करत असतात. त्यामुळे घरे भाड्याने देताना पोलिसांचा ‘ना हरकत दाखला’ घेणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय परदेशी नागरिकांना घरे देताना ‘सी’ फॉर्म भरून पोलिसांचा ना हरकत दाखला घ्यावा लागत होता.

हेही वाचा…आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल

मात्र अनेक परदेशी नागरिक पोलिसांच्या अशा दाखल्याशिवाय रहात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अशा परदेशी नागरिकांना घरे देणार्‍यांविरोधातही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात एकूण ११ घरमालकांविरोधात कारवाई केली आहे. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम ७ अन्वये कोणत्याही परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना २४ तासांच्या आत पोलिसाना कळवणे बंधनकारक असतं. त्यामुळे अशी माहिती दडवून ठेवणार्‍यांना भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८, रिपोर्ट टू पोलीस ऑर्डर १९७१ च्या नियम २ अन्वये, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ च्याकमल १४ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात देखील तुळींज पोलिसांनी अशाप्रकारे परदेशी नागरिकांना घरे देणार्‍या ११ जणांवर गुन्हेदाखल केले होते. त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल केल्याने त्याना शिक्षा आणि दंड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा…हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई

पोलिसांना माहिती न देता परदेशी नागरिकांना घरे देणार्‍या घरमालकांविरोधात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. यातील बहुतांश परेदशी नागरिक हे नायजेरीयन देशातील आहेत, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितल. सध्या शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार घरात भाडेतत्वावर, तसेच हॉटेल, लॉजेस, क्लब, गेस्ट हाऊस इत्यादी ठिकाणी परदेशी नागरीक आल्यास त्यांची माहिती विहित प्रपत्रामध्ये २४ तासांच्या आत पोलिसांना देणे बंधनकारक आहे.