वसई: पालघर जिल्ह्याच्या औषध निरिक्षका आरती कांबळी यांंच्यावर एका औषध विक्रेत्याकडून १ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचेची १ लाखांची रक्कम स्विकारतांना कांबळी यांच्या सहाय्यकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच कांबळी फरार झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सलून चालकाने चालवली मिनी स्कूल बस, बस शिरली दुकानात, व्हिडीयो व्हायरल

फिर्यादी ३२ वर्षीय औषध विक्रेता आहे. पालघरच्या औषध निरिक्षिका आरती कांबळी यांनी १४ जून रोजी तक्रारदार यांच्या मालकीच्या औषध दुकानाची (मेडिकल स्टोअर) ची तपासणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने त्याच्या औषध विक्री दुकानात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यानंतर तक्रारदाराचे औषध विक्रीचे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली होती. हे बंद ठेवलेले औषध विक्रीचे दुकान परत चालू करण्याकरता कांबळी यांच्या सांगण्यावरून कृष्णराम तिवारी या खासगी इसमाने तक्रारदाराकडे एक लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती. आरती कांबळी यांनी दुजोरा दिल्यानंतर बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास तिवारी याला रंगेहाथ पैसे स्विकारताना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरती कांबळी या फरार झाल्या आहेत. पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar drug inspector asks for bribe of rupees one lakh private person arrested css